Chalu shatak nisarga - paryavaran ani Bharat (Marathi) (चालू शतक, निसर्ग-पर्यावरण आणि भारत!)
By: Shintre, Santosh (शिंत्रे, संतोष प्रभाकर).
Material type:
Item type | Current location | Call number | Copy number | Status | Date due | Barcode | Item holds |
---|---|---|---|---|---|---|---|
![]() |
333.70954 / Shi (Browse shelf) | 1 | Available | 22574 |
Browsing HBCSE Shelves Close shelf browser
No cover image available |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
||
333.707 Lag/Lag 61 Projects In Environmental Education : | 333.70954/C.S.E. Environment Reader for Universities | 333.70954/Nar State of India's Environment | 333.70954 / Shi Chalu shatak nisarga - paryavaran ani Bharat (Marathi) (चालू शतक, निसर्ग-पर्यावरण आणि भारत!) | 333.70954/Sta State of India's Environment 2017 | 333.70954 Sta State of India's Environment | 333.7150954/Nar Why I Should be Tolerant |
भारतीय निसर्ग-पर्यावरणातल्या काही गंभीर समस्यांचा ऊहापोह करणांरं संतोष शिंत्रे यांचं ‘अरण्यरुदन’ हे पुस्तक २००९ मध्ये प्रकाशित झालं. त्यानंतरच्या पाच वर्षांत घडलेल्या स्थानिक ते आंतरराष्ट्रीय घडामोडीमधील गुंतागुंत मांडणारं हे पुढचं पुस्तक.
एका अर्थी, दोन केंद्रीय निवडणुकांमधल्या पाच वर्षांतला (२००९ ते २०१४) भारतीय निसर्ग पर्यावरणाचा हा एक ताळेबंद म्हणता येईल.
प्रश्न, सरकारी आणि नागरी पातळीवरील सर्वंकष औदासीन्य यांनी अद्यापही भारतीय निसर्ग-पर्यावरण ग्रासलं आहे. मूलस्त्रोत ओरबाडण्यातले भ्रष्टाचार अक्राळविक्राळ स्वरूपात, त्यातल्या आंतरराष्ट्रीय हितसंबंधांसह उघडकीला येत आहेत. यातले बारकावे मराठी वाचकापर्यन्त पोहचावेत; २०१४ मध्ये नव्या शासनव्यवस्थेला सामोरे जाताना या विषयांमधली त्यांची सतर्कता वाढावी, हा या लेखनामागचा प्रमुख हेतू.
याच वर्षांमध्ये विज्ञानाधारित निसर्ग-विज्ञानानं अनेक नवीन पर्यावरणीय सत्यं उजेडात आणली. त्यामुळे अर्थशास्त्रीय मांडणी आणि अग्रक्रमांमध्ये बदल झाले. पण आजही अनेक नेते, विचारवंत, अर्थशास्त्र, शेतकऱ्यांचे नेते, पत्रकार यांच्य मांडणीत ही सत्यं, हे बदल उमटताना दिसत नाहीत. प्रश्नाचे पर्यावरणीय कंगोरे त्यांच्या विवेचनातून निसटलेले दिसतात. हे कंगोरे सोप्या भाषेत वाचकांपर्यन्त पोहोचावेत, हाही उद्देश या लेखनामागे आहे.
पुस्तकाचा उपोद्घात भारतामधल्या या विषयांतल्या सर्वाधिक महत्त्वाच्या अकरा प्रश्नांचं विवेचन आणि त्यावरचे नागरी आणि शासकीय पातळीवरील उपाय मांडतो. तर उपसंहार हवामान बदलाच्या २०१४ मधील जागतिक धोक्यांचं सविस्तर विवेचन आणि निसर्ग संरक्षणाच्या भावी दिशांचे संभाव्य उपाय, वैज्ञानिकांचे अंदाज वाचकांसमोर ठेवतो.
लेखनोत्तर कालात २०१४ च्या पूर्वार्धापर्यंत नव्याने सामोरी आलेली माहिती, गरजेनुसार त्या त्या लेखानंतर लगेचच वाचकांपुढे मांडली आहे. त्यामुळे त्यांच्या जाणीवा अद्ययावत राहतील.
There are no comments for this item.